Home

शिवम् गायकवाड – विद्यार्थी, मुसाफिर, मित्र…

मी University of Nebraska at Omaha मध्ये पदवी शिक्षण घेत आहे. भारतात बारावी नंतर परदेशात शिक्षण घेण्याच्या निर्णयाने माझे संपूर्ण आयुष्य बदलले. अमेरिकी संस्कृतीत व शिक्षण शिक्षणपद्धतीत वावरतांना जगलेले अनुभव डोळसपणे व्यक्त करण्याचा आणि परदेशात शिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न…

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

परदेशी शिक्षणाची तयारी करण्यासाठी तीन महत्त्वाचे टप्पे असतात.

1)GRE/SAT/IELTS परिक्षा पार पाडणे व योग्य विद्यापीठ निवडणे.

वरील व इतर अनेक परिक्षांसाठी योग्य वेळेत तयारी करणे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, व्यक्तिमत्त्व, प्रागतिक इच्छा व आकांक्षा यांसारख्या इतर अनेक महत्वपूर्ण बाबी लक्षात घेणे आणि योग्य ते विद्यापीठ निवडून त्या विद्यापीठाचा अर्ज भरणे.

2)परदेशी Visa मिळवणे व प्रवासाची तयारी करणे.

भारतात वसलेल्या परदेशी दूतावासाची मुलाखत यशस्वीरित्या पूर्ण करून परदेशी Visa मिळवणे. विमानाचे आरक्षण करणे. भारताबाहेर न मिळणाऱ्या व आवश्यक वस्तूंची यादी बनवून प्रवासाची तयारी करणे.

3)परदेशी रवाना होण्याची मानसिक तयारी करणे.

समोर येणाऱ्या अपेक्षित आणि अनपेक्षित प्रसंगांची मानसिक तयारी करणे. येणारी वेळ ही आयुष्य बदलून टाकणारी आहे, हे जाणून स्वतःच्या भविष्याप्रति धाडसाने वाटचाल करणे. संभवनीय/आपात्कालीन परिस्थितीत उपाय आणि संसाधने उपलब्ध करून घेणे.


वरील बाबींमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या अनेक Consultancy Firms महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात कार्यरत आहेत. मी स्वतः सुद्धा अशाच एका फर्ममधून तयारी करून इथे आलोय. परंतु इथे आल्यावर काय करायला हवे आणि काय केले यातला फरक समजला. म्हणतात ना, अनुभव हा सगळ्यात मोठा गुरू असतो! तसेच माझ्या बाबतीत घडले आहे. मी तीन वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत जीवशास्त्राचा विद्यार्थी असून वरील प्रक्रियेतून स्वतः गेलो आहे. परदेशी शिक्षणाचे भारतातले सल्लागार आपल्यासमोर येथील शिक्षणाचे संपूर्ण चित्र प्रस्तुत करण्यात अपयशी ठरतात, हे मला कळून चुकले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे सद्यस्थितीबद्दल मत, विद्यापीठाच्या विविध विभागातील खर्चाचे अहवाल व यांसारख्या इतर अनेक गुणवत्ता ठरवणाऱ्या महत्वपूर्ण बाबी ते दुर्लक्षित ठेवतात. परदेशात शिक्षण हा सर्वांच्याच आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे; येथील शिक्षणाचा आणि शिक्षणपद्धतीचा पुरेपूर फायदा आपण करून घ्यायलाच हवा…

योग्य विद्यापीठाची निवड करणे हा परदेशी शिक्षणातला खूप महत्वाचा भाग आहे. येणारी अनेक वर्षे आपण या विद्यापीठाचा भाग बनून तेथील संस्कृतीशी समरस होतो. या विद्यापीठाच्या आधारावर आपली शैक्षणिक आणि वैयक्तिक जडणघडण होते. कॉलेजची फी, शिष्यवृत्ती, स्थानिक हवामान आणि रँकिंग एवढ्याच संकुचित मुद्द्यांवर मर्यादित न राहता तेथील विद्यार्थ्यांचा सहभाग, कॅम्पस वरील उपक्रम, त्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे मत आणि स्थानिक समस्या यांसारखे अनेक मुद्दे शैक्षणिक प्रगतीसाठी जाणून घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया खरंच परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्याहून चांगली कोण जाणेल! हा विचार करूनच मी बाबतीत पुढाकार घेत आहे. परदेशस्थ शिक्षण हा मुद्दा बारकाईने करण्यासारखा आहे, त्यात मी तुमच्या पाठीशी आहे.

परदेशात उच्च शिक्षणाची इच्छा आहे पण नोकरी करत आहात? हरकत नाही!

अनेक नोकरी करणारे विद्यार्थीसुद्धा परदेशात शिकतात. परदेशात शिक्षणासाठी सर्वांसाठीच असंख्य संधी उपलब्ध करून घेता येतात.

मी आपल्यासाठी काय करू शकतो?

  1. परदेशात शिक्षण प्रक्रियेचा परिचय आणि मार्गदर्शन.
  2. योग्य विद्यापीठ निवडण्यात महत्वाचे मुद्दे व त्या मुद्द्यांविषयी मार्गदर्शन.
  3. परदेशी शिक्षणात येणाऱ्या अडचणी, समुपदेशन, विद्यापीठाच्या शैक्षणिक पर्यावरणात योग्य प्रगती करून घेण्यासाठी मार्गदर्शन.

विद्यार्थी आणि पालक मार्गदर्शनासाठी संपर्क साधा…

Email : info@shivamlenix.com

Whatsapp: +917775077603

अलिकडील लेख…

माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…

Written May 14th, 2020 अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत नसली तरीही येथील दैनंदिन जीवन सामान्य होण्याच्या मार्गावर आहे.  कोरोनाची लस किंवा इलाज सापडेपर्यंत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, बाहेर वावरतांना ठराविक अंतर टिकवून ठेवणे हेच आता  “सामान्य” बनत चालले आहे. कोरोनावर इलाज सापडल्यानंतरही आपल्याला सामाजिक वर्तणूक आणि शारीरिक स्वच्छता नियमावली पाळावी लागणार आहेच.Continue reading “माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…”

कोरोना- अमेरिकन पंचनामा…

Written April 12th, 2020 मी अमेरिकेत एका विद्यापीठात शिकतोय. आमची चालू सेमिस्टर जानेवारी महिन्यात सुरु झाली. तेव्हा ‘कोरोना व्हायरस’ हा फक्त चीन मध्ये पसरल्याची बातमी कानावर येत होती आणि हा विषय अमेरिकेत एवढा गंभीर नव्हता. माझ्या विद्यापीठाचे कामकाज तेव्हा सुरळीत चालू होते. अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीच्या अखेरीस वॉशिंग्टन या राज्यात सापडला. हा रुग्ण काहीContinue reading “कोरोना- अमेरिकन पंचनामा…”

न संपणारा हा प्रवास…

Written March 27th, 2020 ह्या घटना मागील सेमिस्टरच्या आहेत. धावपळ करतांना सेमिस्टर कधी संपत आली, हे कळले सुद्धा नाही. दैनंदिन कामकाजात स्वतःला वेळ देणे क्वचितच शक्य होत होते. रुटीनला कंटाळून घड्याळाच्या काट्यांच्या कैदेतून बाहेर  पडण्याची मनाला चाहूल लागली होती. परिक्षा संपली आणि लागलीच बाहेर फिरायला निघालो. कुठे जायचे आहे हे ठरलेले नसतानाही नेब्रास्काच्या बर्फापासून कुठेतरीContinue reading “न संपणारा हा प्रवास…”

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.