माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…

Written May 14th, 2020 अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत नसली तरीही येथील दैनंदिन जीवन सामान्य होण्याच्या मार्गावर आहे.  कोरोनाची लस किंवा इलाज सापडेपर्यंत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, बाहेर वावरतांना ठराविक अंतर टिकवून ठेवणे हेच आता  “सामान्य” बनत चालले आहे. कोरोनावर इलाज सापडल्यानंतरही आपल्याला सामाजिक वर्तणूक आणि शारीरिक स्वच्छता नियमावली पाळावी लागणार आहेच.Continue reading “माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…”

कोरोना- अमेरिकन पंचनामा…

Written April 12th, 2020 मी अमेरिकेत एका विद्यापीठात शिकतोय. आमची चालू सेमिस्टर जानेवारी महिन्यात सुरु झाली. तेव्हा ‘कोरोना व्हायरस’ हा फक्त चीन मध्ये पसरल्याची बातमी कानावर येत होती आणि हा विषय अमेरिकेत एवढा गंभीर नव्हता. माझ्या विद्यापीठाचे कामकाज तेव्हा सुरळीत चालू होते. अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीच्या अखेरीस वॉशिंग्टन या राज्यात सापडला. हा रुग्ण काहीContinue reading “कोरोना- अमेरिकन पंचनामा…”

न संपणारा हा प्रवास…

Written March 27th, 2020 ह्या घटना मागील सेमिस्टरच्या आहेत. धावपळ करतांना सेमिस्टर कधी संपत आली, हे कळले सुद्धा नाही. दैनंदिन कामकाजात स्वतःला वेळ देणे क्वचितच शक्य होत होते. रुटीनला कंटाळून घड्याळाच्या काट्यांच्या कैदेतून बाहेर  पडण्याची मनाला चाहूल लागली होती. परिक्षा संपली आणि लागलीच बाहेर फिरायला निघालो. कुठे जायचे आहे हे ठरलेले नसतानाही नेब्रास्काच्या बर्फापासून कुठेतरीContinue reading “न संपणारा हा प्रवास…”

आठवणींचा पूल : बॉब केरी ब्रिज

Audio ऐकण्याकरता… Written November 30th, 2019 ओमाहात येऊन काळ किती भरभर निघून गेला! आत्ता आत्ता आलोय असे वाटत असतानाच दोन वर्ष होऊनही गेली! नुकतीच नवीन गाडी घेतली आहे. ओमाहा शहर बरेचसे पसरट असल्यामुळे दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी आणि बारीकसारीक कामांसाठी  लांबवर जावे लागते. इथली बससेवा ‘ओमाहा मेट्रो’ नावानेच ओळखली जाते. ही इथली सार्वजनिक वाहतुक सेवा!Continue reading “आठवणींचा पूल : बॉब केरी ब्रिज”

अमेरिकेतील शिक्षणाचा आर्थिक पैलू

Audio ऐकण्याकरता… Written September 22, 2019 नवीन शैक्षणिक वर्षात नवीनच ओळख झालेल्या प्राध्यापकांपैकी माझे एक प्राध्यापक आगळे-वेगळे आहेत. ते रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री शिकवतात. इतके छान शिकवतात की विद्यार्थ्यांना वेळेचे भान राहत नाही. त्यांचे शिकवणे जेवढे खोल आणि विचार करायला लावणारे असते तेवढेच माझे प्राध्यापक ही प्रक्रिया विनोदी सुद्धा बनवतात. विनोद आणि खोडकरपणा हा त्यांच्या स्वभावाचाContinue reading “अमेरिकेतील शिक्षणाचा आर्थिक पैलू”

गणपती, माझ्या घरी…

Audio लेख ऐकण्याकरता… Written September 11, 2019 गणपतीचे दिवस वेगळेच असतात. लहानपणापासून आजपर्यंत गणपतीचे दहा दिवस म्हटले की किती छान छान गोष्टी आठवतात. आम्ही भावंडे मिळून गणपती येण्याआधी त्याच्या पाटाभोवती सजावट करायचो. सर्वांच्या शाळा-कॉलेजची वेळ वेगवेगळी असतांनाही एक ठराविक वेळ निवडून आम्ही जमायचो. यादी तयार करून व आवश्यक सामान एकत्र जाऊन घेऊन आल्यानंतर सर्वांचे मतContinue reading “गणपती, माझ्या घरी…”

नवे वर्ष नवी आशा

Written September 3rd, 2019 येथे सुट्ट्या संपून आता क्लासेसना सुरूवात झाली आहे. माझी ही आता तिसऱ्या वर्षाची सुरूवात आहे. मी यावर्षी अभ्यासाला घेतलेले विषय हे मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक अवघड आणि त्याच बरोबर तेवढेच मनोरंजकही आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठात परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मी आणि माझी जुनी मित्र मंडळी सुद्धा आहेत. अनेकांसाठी हा उन्हाळा अभ्यासContinue reading “नवे वर्ष नवी आशा”

शिक्षणपद्धती आणि आत्मपरीक्षण

Written August 11, 2018 महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार २०१७ मध्ये मी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालो. माझा आवडीचा विषय असलेला जीवशास्त्र आणि तत्सबंधी विषयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी मी अमेरिकेतील विद्यापीठाची निवड करायची असे ठरवले होते. आता प्रश्न पडतो की, अमेरिका का? याचे कारण म्हणजे काळाप्रमाणे चालणारी तेथील शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमातील लवचिकता! मी अनेक विद्यापीठांचा अभ्यास केलाContinue reading “शिक्षणपद्धती आणि आत्मपरीक्षण”

ओमाहातील शेतकरी आणि माझी वैचारिक मशागत

Written August 17, 2019 आज हा लेख लिहिताना डोळ्यासमोर अनेक गोष्टी येत आहेत. मी भारतात असताना पडलेला पाऊस, पूर, शेतकऱ्यांचे नुकसान, शेती आणि एक शहरी म्हणून माझे जीवन, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता नेब्रास्कात उन्हाळा संपत आला आहे. भारतात सर्वाधिक तापमान मे महिन्यात असते तर येथे तसेच तापमान जुलै महिन्यात असते. शाळा-कॉलेजाना साधारणContinue reading “ओमाहातील शेतकरी आणि माझी वैचारिक मशागत”

प्रवास, जाणिवेचा…

Written August 2, 2019 ।। ओमाहा ते लॉस अँजिलिस ।। अमेरिकेत शिक्षण घ्यायचे ठरवले तेव्हापासून असलेली हुरहूर आताशा कमी होत आली आहे. रुळतोय आता हळूहळू इथे. अमेरिकेतील माझ्या शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील दोन वर्षे म्हणजेच जवळपास अर्धी डिग्री या उन्हाळ्यात पूर्ण होत आली आहे. गेलेल्या दोन वर्षांनी पुढील आयुष्यात येणाऱ्या अनेक वर्षांची कल्पना दिली आहे. अनेकContinue reading “प्रवास, जाणिवेचा…”