काऊचसर्फिंग- जागतिक संधींचे माहेरघर

Written May 16, 2019 बऱ्याच कालावधी नंतर Couchsurfing वर एका व्यक्तीने काही काळ माझ्याकडे येऊन राहण्याची विनंती केली. त्यांनी केलेली विनंती अतिशय साधी, सरळ आणि नम्र होती. माझ्या हॉस्टेलमध्ये जागा नसल्यामुळे आणि विद्यापीठाच्या परीक्षा या कारणांमुळे मला त्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे शक्य नव्हते. पण तरीही त्या व्यक्तीने भेटण्याचा केला आणि काही वेळ सोबत घालवण्याचाही आग्रहContinue reading “काऊचसर्फिंग- जागतिक संधींचे माहेरघर”

एक पाऊल बदले जीवन

Written April 28, 2019 अतिशय थंडीचा हंगाम संपला आहे. ओमाहात आता सूर्य परतला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. लोकं टी-शर्ट, शॉर्ट्स आणि गॉगल घालून बाहेर सूर्यप्रकाशाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. गोल्फ खेळणारी मंडळीसुद्धा त्यांच्या गॉल्फकार्ट मध्ये वावरतांना दिसत आहेत. बर्फ वितळला आहे. थंडीत गोठलेले झरे आता खळाळून वाहत आहेत. झाडे आणि गवतासारखीच मलाहीContinue reading “एक पाऊल बदले जीवन”

बर्फ-मजा की सजा?

Written March 21, 2019 या वर्षी अमेरिकेने, विशेषतः उत्तर अमेरिकेने असह्य हिवाळा अनुभवला आहे. यंदाचा इथला हिवाळा जरा जास्तच वेळ टिकला. सप्टेंबर महिन्यापासून गारठा सुरू झाला आहे तो मार्च महिन्यापर्यंत येऊन ठेपला आहे. इथे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झाडांची पानं लाल रंगात रूपांतरित होऊन गळायला लागतात. हिवाळी ढगांमुळे हळूहळू सूर्याची हजेरी कमी होत जाते. गवताची हिरवीContinue reading “बर्फ-मजा की सजा?”

लवचिक आणि खंबीर!

Written March 5, 2019 सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आठवीची वार्षिक परीक्षा नुकतीच संपली होती. उन्हाळ्याच्या लांबलचक सुट्टीत मी काय करावे असा प्रश्न माझ्या वडिलांसमोर उभा राहिला. याआधीच्या वार्षिक सुट्ट्या मी नेहमी मामाच्या गावात म्हणजेच ठाण्यात घालवल्या असे. त्याकाळी वडिलांनी घरी संगणक घेण्याचे टाळले होते. पण मामाकडे संगणक असल्यामुळे सुट्टीतला बराचसा वेळ मी संगणकावरचे खेळ खेळण्यातContinue reading “लवचिक आणि खंबीर!”

केला स्वयंपाक आणि वाढलं प्रेम!

Written February 19, 2019 अमेरिकेत माझ्यासाठी येणारी पहिली व्यक्ती म्हणजे अमोल. आम्ही भारतातही अशी भटकंती केली आहे की, जिने आम्हाला आयुष्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. आम्ही पर्यटक म्हणून न फिरता प्रवासी म्हणून भटकलो, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव खूप वेगळे ठरले. मला वाटतं की, कोणत्याही हेतू शिवाय केलेला प्रवास हा आपल्या आयुष्यासारखा असतो. डायनॅमिक. रोज बदलताContinue reading “केला स्वयंपाक आणि वाढलं प्रेम!”

प्रवास हा माझा !

Written February 10, 2019 अमेरिकेत नुकताच ‘थॅंक्सगिव्हींग’ झाला आहे. उत्तम सुगी झाल्यानंतर अहोभाव – धन्यवादभाव प्रकट करण्याचा छानसा उत्सव. सगळेजण अगदी मजेत साजरा करतात. जागोजागी सेल लागलेले असतात. लोकं एकमेकाला शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. अगदी जिवंतपणा असतो यात. आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते ख्रिसमसचे. नाताळ इथला सगळ्यात मोठा सण. नाताळाआधी आमच्या विद्यापीठात पहिल्या सत्रातल्याContinue reading “प्रवास हा माझा !”

एक एक पाऊल

Written November 24, 2018 अमेरिकेतल्या शिक्षणाचा तिसरा टप्पा म्हणजेच माझी तिसरी सेमिस्टर पूर्ण होत आली आहे. हे दीड वर्ष कसं गेलंय ते कळलंच नाही. मी सुरूवातीला अतिशय गडबडलेल्या परिस्थितीत आल्यामुळे भांबावून गेलो होतो. मी आज इथे चांगलाच स्थिरावलो आणि सरावलो आहे. माझ्या ओमाहा विद्यापीठात माझ्या सारखी अनेक मुले आहेत. वेगवेगळ्या भाषिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतूनContinue reading “एक एक पाऊल”

आयुष्य = काम

Written November 17, 2018 अमेरिकेत शिकण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शिक्षण घेता घेता वास्तव जगातील अनेक गोष्टींची विविध उपक्रमांद्वारे होणारी ओळख आणि जागतिक दृष्टीकोनातून दिले जाणारे शिक्षण. आमच्या एका इमारतीत खूप छान वाक्य कोरलेले आहे, ‘एक विचारशील प्राणी म्हणून शिक्षण महत्वाचे असते आणि जगण्यासाठी काम.’ मी ओमाहात येईपर्यन्त असेच ऐकत होतो की, शिक्षण हे पोटापाण्यासाठीContinue reading “आयुष्य = काम”

‘बघता’ आलं पाहिजे!

Written November 10, 2018 ओमाहामध्ये शरद ऋतूची सुरुवात झाली आहे. झाडांची पाने हिरव्यातून लाल रंगात परिवर्तीत होताना जणू सृष्टीचं ‘बाईपण’ अधोरेखित होतय असंच वाटतंय. यावर्षी बर्फवृष्टी लवकरच झाली आहे. गारवा अचानक वाढलाय. मला किनारपट्टीचं हवामान आवडतं. उष्ण आणि दमट हवा मला इथे आल्यावर अधिकाधिक हवीहवीशी वाटू लागलीय. पण, हा संघर्ष एक माणूस म्हणून जास्त आवडतोय.Continue reading “‘बघता’ आलं पाहिजे!”

वेदनेतही फुलणारं पालकत्व…

Written November 2, 2018 अमेरिकेतील शिक्षण पद्धत खूप वेगळी आणि रोचक आहे. इथे नुसते शिकायचे नसते; तर शिकून सवरून माणूस बनायचे असते. माणूस म्हणून आवश्यक असलेली संवेदना विकसित व्हावी म्हणून विद्यापीठ स्तरावर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नुसते आयोजन करून हात झटकले जात नाहीत. त्यापुढे जाऊन त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिरीरीने पुढाकार घ्यायला प्रोत्साहनContinue reading “वेदनेतही फुलणारं पालकत्व…”