Blog (मराठी)

माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…

Written May 14th, 2020 अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत नसली तरीही येथील दैनंदिन जीवन सामान्य होण्याच्या मार्गावर आहे.  कोरोनाची लस किंवा इलाज सापडेपर्यंत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, बाहेर वावरतांना ठराविक अंतर टिकवून ठेवणे हेच आता  “सामान्य” बनत चालले आहे. कोरोनावर इलाज सापडल्यानंतरही आपल्याला सामाजिक वर्तणूक आणि शारीरिक स्वच्छता नियमावली पाळावी लागणार आहेच.Continue reading “माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…”

कोरोना- अमेरिकन पंचनामा…

Written April 12th, 2020 मी अमेरिकेत एका विद्यापीठात शिकतोय. आमची चालू सेमिस्टर जानेवारी महिन्यात सुरु झाली. तेव्हा ‘कोरोना व्हायरस’ हा फक्त चीन मध्ये पसरल्याची बातमी कानावर येत होती आणि हा विषय अमेरिकेत एवढा गंभीर नव्हता. माझ्या विद्यापीठाचे कामकाज तेव्हा सुरळीत चालू होते. अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीच्या अखेरीस वॉशिंग्टन या राज्यात सापडला. हा रुग्ण काहीContinue reading “कोरोना- अमेरिकन पंचनामा…”

न संपणारा हा प्रवास…

Written March 27th, 2020 ह्या घटना मागील सेमिस्टरच्या आहेत. धावपळ करतांना सेमिस्टर कधी संपत आली, हे कळले सुद्धा नाही. दैनंदिन कामकाजात स्वतःला वेळ देणे क्वचितच शक्य होत होते. रुटीनला कंटाळून घड्याळाच्या काट्यांच्या कैदेतून बाहेर  पडण्याची मनाला चाहूल लागली होती. परिक्षा संपली आणि लागलीच बाहेर फिरायला निघालो. कुठे जायचे आहे हे ठरलेले नसतानाही नेब्रास्काच्या बर्फापासून कुठेतरीContinue reading “न संपणारा हा प्रवास…”

आठवणींचा पूल : बॉब केरी ब्रिज

Audio ऐकण्याकरता… Written November 30th, 2019 ओमाहात येऊन काळ किती भरभर निघून गेला! आत्ता आत्ता आलोय असे वाटत असतानाच दोन वर्ष होऊनही गेली! नुकतीच नवीन गाडी घेतली आहे. ओमाहा शहर बरेचसे पसरट असल्यामुळे दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी आणि बारीकसारीक कामांसाठी  लांबवर जावे लागते. इथली बससेवा ‘ओमाहा मेट्रो’ नावानेच ओळखली जाते. ही इथली सार्वजनिक वाहतुक सेवा!Continue reading “आठवणींचा पूल : बॉब केरी ब्रिज”

अमेरिकेतील शिक्षणाचा आर्थिक पैलू

Audio ऐकण्याकरता… Written September 22, 2019 नवीन शैक्षणिक वर्षात नवीनच ओळख झालेल्या प्राध्यापकांपैकी माझे एक प्राध्यापक आगळे-वेगळे आहेत. ते रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री शिकवतात. इतके छान शिकवतात की विद्यार्थ्यांना वेळेचे भान राहत नाही. त्यांचे शिकवणे जेवढे खोल आणि विचार करायला लावणारे असते तेवढेच माझे प्राध्यापक ही प्रक्रिया विनोदी सुद्धा बनवतात. विनोद आणि खोडकरपणा हा त्यांच्या स्वभावाचाContinue reading “अमेरिकेतील शिक्षणाचा आर्थिक पैलू”

गणपती, माझ्या घरी…

Audio लेख ऐकण्याकरता… Written September 11, 2019 गणपतीचे दिवस वेगळेच असतात. लहानपणापासून आजपर्यंत गणपतीचे दहा दिवस म्हटले की किती छान छान गोष्टी आठवतात. आम्ही भावंडे मिळून गणपती येण्याआधी त्याच्या पाटाभोवती सजावट करायचो. सर्वांच्या शाळा-कॉलेजची वेळ वेगवेगळी असतांनाही एक ठराविक वेळ निवडून आम्ही जमायचो. यादी तयार करून व आवश्यक सामान एकत्र जाऊन घेऊन आल्यानंतर सर्वांचे मतContinue reading “गणपती, माझ्या घरी…”

नवे वर्ष नवी आशा

Written September 3rd, 2019 येथे सुट्ट्या संपून आता क्लासेसना सुरूवात झाली आहे. माझी ही आता तिसऱ्या वर्षाची सुरूवात आहे. मी यावर्षी अभ्यासाला घेतलेले विषय हे मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक अवघड आणि त्याच बरोबर तेवढेच मनोरंजकही आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठात परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मी आणि माझी जुनी मित्र मंडळी सुद्धा आहेत. अनेकांसाठी हा उन्हाळा अभ्यासContinue reading “नवे वर्ष नवी आशा”

शिक्षणपद्धती आणि आत्मपरीक्षण

Written August 11, 2018 महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार २०१७ मध्ये मी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालो. माझा आवडीचा विषय असलेला जीवशास्त्र आणि तत्सबंधी विषयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी मी अमेरिकेतील विद्यापीठाची निवड करायची असे ठरवले होते. आता प्रश्न पडतो की, अमेरिका का? याचे कारण म्हणजे काळाप्रमाणे चालणारी तेथील शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमातील लवचिकता! मी अनेक विद्यापीठांचा अभ्यास केलाContinue reading “शिक्षणपद्धती आणि आत्मपरीक्षण”

ओमाहातील शेतकरी आणि माझी वैचारिक मशागत

Written August 17, 2019 आज हा लेख लिहिताना डोळ्यासमोर अनेक गोष्टी येत आहेत. मी भारतात असताना पडलेला पाऊस, पूर, शेतकऱ्यांचे नुकसान, शेती आणि एक शहरी म्हणून माझे जीवन, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता नेब्रास्कात उन्हाळा संपत आला आहे. भारतात सर्वाधिक तापमान मे महिन्यात असते तर येथे तसेच तापमान जुलै महिन्यात असते. शाळा-कॉलेजाना साधारणContinue reading “ओमाहातील शेतकरी आणि माझी वैचारिक मशागत”

प्रवास, जाणिवेचा…

Written August 2, 2019 ।। ओमाहा ते लॉस अँजिलिस ।। अमेरिकेत शिक्षण घ्यायचे ठरवले तेव्हापासून असलेली हुरहूर आताशा कमी होत आली आहे. रुळतोय आता हळूहळू इथे. अमेरिकेतील माझ्या शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील दोन वर्षे म्हणजेच जवळपास अर्धी डिग्री या उन्हाळ्यात पूर्ण होत आली आहे. गेलेल्या दोन वर्षांनी पुढील आयुष्यात येणाऱ्या अनेक वर्षांची कल्पना दिली आहे. अनेकContinue reading “प्रवास, जाणिवेचा…”

काऊचसर्फिंग- जागतिक संधींचे माहेरघर

Written May 16, 2019 बऱ्याच कालावधी नंतर Couchsurfing वर एका व्यक्तीने काही काळ माझ्याकडे येऊन राहण्याची विनंती केली. त्यांनी केलेली विनंती अतिशय साधी, सरळ आणि नम्र होती. माझ्या हॉस्टेलमध्ये जागा नसल्यामुळे आणि विद्यापीठाच्या परीक्षा या कारणांमुळे मला त्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे शक्य नव्हते. पण तरीही त्या व्यक्तीने भेटण्याचा केला आणि काही वेळ सोबत घालवण्याचाही आग्रहContinue reading “काऊचसर्फिंग- जागतिक संधींचे माहेरघर”

एक पाऊल बदले जीवन

Written April 28, 2019 अतिशय थंडीचा हंगाम संपला आहे. ओमाहात आता सूर्य परतला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. लोकं टी-शर्ट, शॉर्ट्स आणि गॉगल घालून बाहेर सूर्यप्रकाशाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. गोल्फ खेळणारी मंडळीसुद्धा त्यांच्या गॉल्फकार्ट मध्ये वावरतांना दिसत आहेत. बर्फ वितळला आहे. थंडीत गोठलेले झरे आता खळाळून वाहत आहेत. झाडे आणि गवतासारखीच मलाहीContinue reading “एक पाऊल बदले जीवन”

बर्फ-मजा की सजा?

Written March 21, 2019 या वर्षी अमेरिकेने, विशेषतः उत्तर अमेरिकेने असह्य हिवाळा अनुभवला आहे. यंदाचा इथला हिवाळा जरा जास्तच वेळ टिकला. सप्टेंबर महिन्यापासून गारठा सुरू झाला आहे तो मार्च महिन्यापर्यंत येऊन ठेपला आहे. इथे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झाडांची पानं लाल रंगात रूपांतरित होऊन गळायला लागतात. हिवाळी ढगांमुळे हळूहळू सूर्याची हजेरी कमी होत जाते. गवताची हिरवीContinue reading “बर्फ-मजा की सजा?”

लवचिक आणि खंबीर!

Written March 5, 2019 सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आठवीची वार्षिक परीक्षा नुकतीच संपली होती. उन्हाळ्याच्या लांबलचक सुट्टीत मी काय करावे असा प्रश्न माझ्या वडिलांसमोर उभा राहिला. याआधीच्या वार्षिक सुट्ट्या मी नेहमी मामाच्या गावात म्हणजेच ठाण्यात घालवल्या असे. त्याकाळी वडिलांनी घरी संगणक घेण्याचे टाळले होते. पण मामाकडे संगणक असल्यामुळे सुट्टीतला बराचसा वेळ मी संगणकावरचे खेळ खेळण्यातContinue reading “लवचिक आणि खंबीर!”

केला स्वयंपाक आणि वाढलं प्रेम!

Written February 19, 2019 अमेरिकेत माझ्यासाठी येणारी पहिली व्यक्ती म्हणजे अमोल. आम्ही भारतातही अशी भटकंती केली आहे की, जिने आम्हाला आयुष्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. आम्ही पर्यटक म्हणून न फिरता प्रवासी म्हणून भटकलो, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव खूप वेगळे ठरले. मला वाटतं की, कोणत्याही हेतू शिवाय केलेला प्रवास हा आपल्या आयुष्यासारखा असतो. डायनॅमिक. रोज बदलताContinue reading “केला स्वयंपाक आणि वाढलं प्रेम!”

प्रवास हा माझा !

Written February 10, 2019 अमेरिकेत नुकताच ‘थॅंक्सगिव्हींग’ झाला आहे. उत्तम सुगी झाल्यानंतर अहोभाव – धन्यवादभाव प्रकट करण्याचा छानसा उत्सव. सगळेजण अगदी मजेत साजरा करतात. जागोजागी सेल लागलेले असतात. लोकं एकमेकाला शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. अगदी जिवंतपणा असतो यात. आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते ख्रिसमसचे. नाताळ इथला सगळ्यात मोठा सण. नाताळाआधी आमच्या विद्यापीठात पहिल्या सत्रातल्याContinue reading “प्रवास हा माझा !”

एक एक पाऊल

Written November 24, 2018 अमेरिकेतल्या शिक्षणाचा तिसरा टप्पा म्हणजेच माझी तिसरी सेमिस्टर पूर्ण होत आली आहे. हे दीड वर्ष कसं गेलंय ते कळलंच नाही. मी सुरूवातीला अतिशय गडबडलेल्या परिस्थितीत आल्यामुळे भांबावून गेलो होतो. मी आज इथे चांगलाच स्थिरावलो आणि सरावलो आहे. माझ्या ओमाहा विद्यापीठात माझ्या सारखी अनेक मुले आहेत. वेगवेगळ्या भाषिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतूनContinue reading “एक एक पाऊल”

आयुष्य = काम

Written November 17, 2018 अमेरिकेत शिकण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शिक्षण घेता घेता वास्तव जगातील अनेक गोष्टींची विविध उपक्रमांद्वारे होणारी ओळख आणि जागतिक दृष्टीकोनातून दिले जाणारे शिक्षण. आमच्या एका इमारतीत खूप छान वाक्य कोरलेले आहे, ‘एक विचारशील प्राणी म्हणून शिक्षण महत्वाचे असते आणि जगण्यासाठी काम.’ मी ओमाहात येईपर्यन्त असेच ऐकत होतो की, शिक्षण हे पोटापाण्यासाठीContinue reading “आयुष्य = काम”

‘बघता’ आलं पाहिजे!

Written November 10, 2018 ओमाहामध्ये शरद ऋतूची सुरुवात झाली आहे. झाडांची पाने हिरव्यातून लाल रंगात परिवर्तीत होताना जणू सृष्टीचं ‘बाईपण’ अधोरेखित होतय असंच वाटतंय. यावर्षी बर्फवृष्टी लवकरच झाली आहे. गारवा अचानक वाढलाय. मला किनारपट्टीचं हवामान आवडतं. उष्ण आणि दमट हवा मला इथे आल्यावर अधिकाधिक हवीहवीशी वाटू लागलीय. पण, हा संघर्ष एक माणूस म्हणून जास्त आवडतोय.Continue reading “‘बघता’ आलं पाहिजे!”

वेदनेतही फुलणारं पालकत्व…

Written November 2, 2018 अमेरिकेतील शिक्षण पद्धत खूप वेगळी आणि रोचक आहे. इथे नुसते शिकायचे नसते; तर शिकून सवरून माणूस बनायचे असते. माणूस म्हणून आवश्यक असलेली संवेदना विकसित व्हावी म्हणून विद्यापीठ स्तरावर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नुसते आयोजन करून हात झटकले जात नाहीत. त्यापुढे जाऊन त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिरीरीने पुढाकार घ्यायला प्रोत्साहनContinue reading “वेदनेतही फुलणारं पालकत्व…”

घरट्यातून खोप्याकडे..

Written Semptember 29, 2018 अमेरिका खूप वेगळी आहे. हा देश स्थलांतरितांनी बनवलेला आहे. त्यात जगभराची वैशिष्ट्य आहेत. मला त्यात थोडीशी मुंबई आणि थोडेसे नाशिक दिसते. मुंबई कॉस्मोपोलिटन आहे. नाशिक थोडं वेगळं आहे. पण नाशिक आणि मुंबई दोन्ही माझी घरटी आहेत. अमेरिकेने तेसुद्धा छान सामावून घेतले आहे.  अमेरिका ‘मेलटिंग पॉट’ असल्याने तिथे सगळयातलं सगळं आहे आणिContinue reading “घरट्यातून खोप्याकडे..”

‘ओ’ माहा!

Written September 14, 2018 ओमाहा हे अमेरिकेच्या बरोबर मध्यभागी वसलेल्या नेब्रास्का राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. एकेकाळी दुर्लक्षित असलेले हे शहर वनसंपदेमुळे प्रकाशझोतात आलं. तेथील खाण उद्योग एकेकाळी बहरात होता. या शहराची स्थापना १८५४ साली झाली. तेथील नगरपालिका २ फेब्रुवारी १८५७ रोजी जन्माला आली. ओमाहा हे शहर आयोवा आणि नेब्रास्का या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे.Continue reading “‘ओ’ माहा!”

खेळता खेळता आयुष्य

Written September 8, 2018 क्रीडा आणि शारीरिक व्यायाम या बाबी अमेरिकन लोकांच्या रक्तात आहेत. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहिल यावर त्यांचा विश्वास आहे. आरोग्याच्या बाबतीत तरुण अमेरिकन खूप जागरूक आहेत. २००७ सालानंतर मात्र सगळ्याच वयोगटातील लोकं अधिक जागरूक होऊ लागले. त्याला कारणही तसेच गंभीर होते. याच वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या सर्व्हेमध्येContinue reading “खेळता खेळता आयुष्य”

ग्राहक बनायचं की ‘गिऱ्हाईक’?

Written August 30th, 2018 मी गेलं वर्षभर अमेरिकेत राहतोय. अमेरिकेत राहून आपलं आपण सगळं व्यवस्थापन करणं हे तितकंसं सोपं नाही. मुळात आपल्या आणि त्यांच्या एकंदर व्यवहारात खूप फरक आहे. माझ्या रोजच्या दैनंदिन गरजा इथल्या लोकल स्टोअर्समधून पूर्ण होत असल्या तरी भाजीपाला आणि किराणा सामानासाठी एक तर मला ओमाहा शहरात डाउन टाऊन मधील जुन्या बाजारात जावेContinue reading “ग्राहक बनायचं की ‘गिऱ्हाईक’?”

गोदावरी ते मिसौरी

Written August 18, 2018 मी अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथे शिकत आहे. रोजच्या धावपळीतून थोडी मोकळीक म्हणून फेरफटका मारणे मला नेहमीच ताजेतवाने करते. एकदा असेच फिरत असतांना माझी आणि मिसौरी नदीची ओळख झाली. ओमाहा हे शहर मिसौरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. एका बाजूला ओमाहा आणि दुसऱ्या बाजूला आयोवा राज्यातील कौन्सिल ब्लफ आणि मधोमध मिसौरी नदीContinue reading “गोदावरी ते मिसौरी”

भाषाशिक्षण आणि अर्थकारण

Written August 11, 2018 संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषा विभागाने नुकतेच जागतिक भाषा सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जगभरातील विविध भाषक समुहांचे विभागवार गट तयार करून अभ्यास केला गेला आहे. याच सर्व्हेनुसार जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषा आहेत : मॅनडारीन (चिनी), स्पॅनिश, इंग्लिश, हिन्दी, अरेबिक, पोर्तुगीज, बंगाली, रशियन, जपानी आणि पंजाबी. या दहा महत्वाच्या जागतिक भाषांमध्ये तीन भारतीयContinue reading “भाषाशिक्षण आणि अर्थकारण”

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.