एक एक पाऊल

Written November 24, 2018 अमेरिकेतल्या शिक्षणाचा तिसरा टप्पा म्हणजेच माझी तिसरी सेमिस्टर पूर्ण होत आली आहे. हे दीड वर्ष कसं गेलंय ते कळलंच नाही. मी सुरूवातीला अतिशय गडबडलेल्या परिस्थितीत आल्यामुळे भांबावून गेलो होतो. मी आज इथे चांगलाच स्थिरावलो आणि सरावलो आहे. माझ्या ओमाहा विद्यापीठात माझ्या सारखी अनेक मुले आहेत. वेगवेगळ्या भाषिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतूनContinue reading “एक एक पाऊल”

आयुष्य = काम

Written November 17, 2018 अमेरिकेत शिकण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शिक्षण घेता घेता वास्तव जगातील अनेक गोष्टींची विविध उपक्रमांद्वारे होणारी ओळख आणि जागतिक दृष्टीकोनातून दिले जाणारे शिक्षण. आमच्या एका इमारतीत खूप छान वाक्य कोरलेले आहे, ‘एक विचारशील प्राणी म्हणून शिक्षण महत्वाचे असते आणि जगण्यासाठी काम.’ मी ओमाहात येईपर्यन्त असेच ऐकत होतो की, शिक्षण हे पोटापाण्यासाठीContinue reading “आयुष्य = काम”

‘बघता’ आलं पाहिजे!

Written November 10, 2018 ओमाहामध्ये शरद ऋतूची सुरुवात झाली आहे. झाडांची पाने हिरव्यातून लाल रंगात परिवर्तीत होताना जणू सृष्टीचं ‘बाईपण’ अधोरेखित होतय असंच वाटतंय. यावर्षी बर्फवृष्टी लवकरच झाली आहे. गारवा अचानक वाढलाय. मला किनारपट्टीचं हवामान आवडतं. उष्ण आणि दमट हवा मला इथे आल्यावर अधिकाधिक हवीहवीशी वाटू लागलीय. पण, हा संघर्ष एक माणूस म्हणून जास्त आवडतोय.Continue reading “‘बघता’ आलं पाहिजे!”

वेदनेतही फुलणारं पालकत्व…

Written November 2, 2018 अमेरिकेतील शिक्षण पद्धत खूप वेगळी आणि रोचक आहे. इथे नुसते शिकायचे नसते; तर शिकून सवरून माणूस बनायचे असते. माणूस म्हणून आवश्यक असलेली संवेदना विकसित व्हावी म्हणून विद्यापीठ स्तरावर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नुसते आयोजन करून हात झटकले जात नाहीत. त्यापुढे जाऊन त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिरीरीने पुढाकार घ्यायला प्रोत्साहनContinue reading “वेदनेतही फुलणारं पालकत्व…”